बंधाऱ्याचे पाणी शेतीमध्ये, शेतातील  माती नदीमध्ये

Homeताज्या बातम्याअहमदनगर

बंधाऱ्याचे पाणी शेतीमध्ये, शेतातील माती नदीमध्ये

खरवंडी कासार . मुंगूसवाडे येथील शेतकरी सुदाम शंकर हिंगे यांच्या जमीनी जवळ बंधारा आहे . या बंदार्यामधुन पाणी जमिनीत वारंवार गेल्यामुळे जमिनीला

मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागावे
हनुमंत पाटीलबा गायकवाड यांचे निधन
तब्बल 15 वर्षापासून फरार असणारा पकडला ; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

खरवंडी कासार .

मुंगूसवाडे येथील शेतकरी सुदाम शंकर हिंगे यांच्या जमीनी जवळ बंधारा आहे . या बंदार्यामधुन पाणी जमिनीत वारंवार गेल्यामुळे जमिनीला मोठा खड्डा होऊन जमिन वाहुन गेली आहे. या शेतकऱ्यांनी नुसकान भरपाई संदर्भात तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की माझी जमीन बंधाऱ्याचे पाणी शिरल्यामुळे जमिनीचा काही भाग पूर्णपणे वाहून व तुटून गेला आहे तरी मला माझे नुसकान भरपाई मिळावी असे या अर्जामध्ये म्हटले आहे. भगवानगड परिसरात सर्वच गावात प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे करायला कोणताही प्रशासकीय अधिकारी फिरायला नसल्यामुळे, नेमके नुकसान किती झाले आहे हा अंदाज नाही परंतु शेतकरी आता मोठा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून मदतीची शासनाकडून मदतीची अपेक्षा केली जाते. शेतकरी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारत आहे

COMMENTS