बंदी असूनही सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंदी असूनही सातारा जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा

कोरेगाव/प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही कोरेगाव तालुक्यातील बोरजाईवाडी गावाच्या हद्दीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पो

दीपाली सय्यद यांची माजी स्वीय सहायकाविरोधात पोलिसात तक्रार
व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 23 वर्षीय तरुणाचा गळफास | LOKNews24
विधानसभेला ताकद दाखवून देवू : मनोज जरांगे

कोरेगाव/प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही कोरेगाव तालुक्यातील बोरजाईवाडी गावाच्या हद्दीत बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल करून तीन बैल व तीन चारचाकी वाहने, असा 40 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच खटाव तालुक्यातील मायणी नजीक कानकात्रे येथील बैलगाडा शर्यतप्रकरणी 17 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गेल्या मंगळवारी कारवाई होऊनही काल पुन्हा शर्यतीच्या आयोजनाचे धाडस संबंधितांनी केल्याने पोलिसांनी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने बैलगाडी शर्यतीचा आखाडा उखडून टाकला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अफसर युनूस पठाण (रा. डिस्कळ, ता. खटाव), बाबूराव मोहन कदम (रा. चंचळी, ता. कोरेगाव), शिवाजी भागवत वावरे, अभिजित प्रकाश जगदाळे (दोघेही रा. कुमठे, ता. कोरेगाव), वर्धमान विलास येवले (रा. शेंदूरजणे, ता. कोरेगाव), चेतन देविदास खंदारे (रा. कोंढवले, ता. मुळशी, जि. पुणे), योगेश प्रकाश जगदाळे (रा. कुमठे, ता. कोरेगाव), आशुतोष प्रवीण भोसले, सूरज शिवाजी भोसले (दोघेही रा. एकसळ, ता. कोरेगाव), घनश्याम अनिल भोईटे, अजय तानाजी यादव (दोघेही रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव) यांच्यासह अन्य अनोळखी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. बोरजाईवाडी गावाच्या हद्दीत बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना काल मिळाली. त्यानंतर त्यांनी शर्यती बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार उपअधीक्षक गणेश किंद्रे, निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक निरीक्षक अर्चना शिंदे, उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस अंमलदार किशोर भोसले, प्रमोद जाधव, धनंजय दळवी, मच्छिंद्र कोकणी, शंकर पाचांगणे व चव्हाण यांचे पथक बोरजाईवाडी गावाच्या हद्दीतील बुरूड माळ नावाच्या शिवारात कारवाईसाठी गेले. त्या ठिकाणी बैलांना क्रूर वागणूक देऊन बैलांच्या शर्यती भरवून त्यात प्रथम येणार्‍या बैलगाडीवर आपसांत सट्टा लावून जुगार खेळत असताना संशयित आढळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमध्ये तीन बैल व तीन चारचाकी वाहने, असा 40 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासंदर्भात अंमलदार धनंजय दळवी यांनी फिर्याद दिली आहे. सहायक फौजदार विजय जाधव अधिक तपास करत आहेत. यापुढे याठिकाणी अशा बेकायदेशीर बैलगाडी शर्यती होऊ नयेत, म्हणून शर्यती भरविण्यासाठी तयार केलेला आखाडा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साह्याने उखडून उध्दवस्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS