बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?

Homeसंपादकीयदखल

बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?

जेंव्हा जेंव्हा पंकजा मुंडे यांच्या राजकारणातील मुस्कटदाबीचा विषय चर्चेत येतो तेंव्हा तेंव्हा स्व.गोपीनाथ मुंडेची आठवण काढली जाते.पंकजा मुंडे यांची र

भाजप यापुढे स्वबळावर…जिल्ह्यात 12 आमदार हवेत
मनपात आता 67 विरुद्ध0 …विरोधक कोणी देता का?
नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता

जेंव्हा जेंव्हा पंकजा मुंडे यांच्या राजकारणातील मुस्कटदाबीचा विषय चर्चेत येतो तेंव्हा तेंव्हा स्व.गोपीनाथ मुंडेची आठवण काढली जाते.पंकजा मुंडे यांची राजकीय मुस्कटदाबी आणि मुंडे साहेबांचे योगदान यांची तुलना केली जाते.मुस्कटदाबीला त्रागून बंडाचे निशाण हाती घेण्याचे संकेत मिळाले की पुन्हा मुंडे साहेबांच्या निष्ठेची आठवण करून देण्यासाठी भाजपातील सत्तेचे भाट पुढे येतात.यावेळीही अशा काही भाटांनी पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार नाहीत हे भाकीत हमीपत्रावर सांगतांना भाजपाने गोपीनाथ मुंडे यांच्या पदरात टाकलेल्या दानाचा हवाला दिला. इथे कुणी कुणाला काय दिले? हा खरे तर कळीचा मुद्दा ठरू शकतो.
दिल्लीवारीनंतर पंकजा मुंडे यांनी समर्थकांना दिलेला सल्ला त्यांच्या नजिकच्या काळातील राजकीय वाटचालीची दिशा ठरविण्यास पुरेसा आहे,केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारीत फेरबदलानंतर महाराष्ट्र भाजपात दिसणारे मुंडे समर्थकांचे संभाव्य बंड शमले का? असा प्रश्न पडलेले जाणकार उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असले तरी तुर्तास काही हाती लागेल असे दिसत नाही.मुंडे यांच्या दिल्लीवारीने भाजपची शकले पाहू इच्छिणाऱ्यांसोबत सनसनी ब्रेकींगच्या शोधात असलेल्या माध्यमांचीही घोर निराशा झाली आहे.दुसऱ्या बाजूला राजकारणातील धर्मयुध्दात सक्रीय असलेल्या पांडव कौरवांचीही चर्चा बाजार गरम करू लागली असली तरी राजकीय आयुष्याच्या क्षितिजावरील मंद आचेवर तरळत असलेला सुर्य मावळतीला जाणार नाही यासाठी प्रत्येक पाऊल विचारांनीच टाकण्याचा विचार करून पंकजा मुंडे यांनी वरळी गाठल्याचे दिसते.आजपर्यंतचा राजकीय प्रवास खडतर होता,भविष्यही खडतर दिसते.हे पंकजांचे वक्तव्य दिल्लीवारीने धडा शिकविल्याचे स्पष्ट करते. केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील भाजपाला हादरे बसू लागले.विशेषतः मुंडे समर्थकांनी दिलेले राजीनामे गेली दोन चार दिवस महाराष्ट्राचे राजकारण तापवू पहात होते.बीड पाठोपाठ अहमदनगर आणि मुंबईतही एखाद दोन पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे चर्चेत येऊ लागले असताना पंकजा मुंडे यांना दिल्ली दरबारात बोलावणे आले.पंकजा मुडे या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीवर पदाधिकारी आहेत,शिवाय मध्यप्रदेश भाजपाचीही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.या नात्याने पंकजा मुंडे पक्ष बैठकीसाठी दिल्लीला गेल्याचे सांगीतले जात होते.मात्र दिल्लीला जाण्याची वेळ आणि मुंडे समर्थकांची राजीनामा लाट हा निव्वळ योगायोग नव्हता,हे पंकजांच्या नरमलेल्या सुरातून स्पष्ट होते.
शब्द कुठलेही असले तरी चेहऱ्यावर दिसणारे हावभाव त्या शब्दांचा अर्थ स्पष्ट करून जातात.विस्तारात प्रितम मुंडे यांना डावलल्या गेल्यानंतर व्यक्त होतांना चेहऱ्यावर दिसणारे भाव आणि दिल्लीहून परतल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना चेहऱ्यावर उमटलेले भाव यातून पंकजा मुंडे यांना वर्तमान आणि भविष्याची जाणीव करून देण्यात दिल्लीकर पक्षश्रेष्ठीं कमालीचे यशस्वी झाल्याचे दिसले.अवसान उसणे घेण्याचा प्रयत्न ना त्या दिवशी लपून राहीला ना आज.एकूणच पंकजा मुंडे यांनी आपल्या मर्यादा समजून घेत आहे तिथेच सुखाने नांदण्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांनाही सबूरीचा सल्ला दिला असावा. जेंव्हा जेंव्हा पंकजा मुंडे यांच्या राजकारणातील मुस्कटदाबीचा विषय चर्चेत येतो तेंव्हा तेंव्हा स्व.गोपीनाथ मुंडेची आठवण काढली जाते.पंकजा मुंडे यांची राजकीय मुस्कटदाबी आणि मुंडे साहेबांचे योगदान यांची तुलना केली जाते.मुस्कटदाबीला त्रागून बंडाचे निशाण हाती घेण्याचे संकेत मिळाले की पुन्हा मुंडे साहेबांच्या निष्ठेची आठवण करून देण्यासाठी भाजपातील सत्तेचे भाट पुढे येतात.यावेळीही अशा काही भाटांनी पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार नाहीत हे भाकीत हमीपत्रावर सांगतांना भाजपाने गोपीनाथ मुंडे यांच्या पदरात टाकलेल्या दानाचा हवाला दिला.इथे कुणी कुणाला काय दिले? हा खरे तर कळीचा मुद्दा ठरू शकतो.जेंव्हा भाजपाला कुणी विचारत नव्हते,आज भाटगीरी करणारेही जेंव्हा भाजपाला शेठजी भटजींचा पक्ष म्हणून हिणवत तत्कालीन सत्तेची लाचारी करीत होते त्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी या पक्षाशी एकनिष्ठ राहून पायाला फोड येईपर्यंत पक्ष वाढवून सत्ता मिळवून दिली.गोपीनाथ मुंडेंना भाजपाने जे दिले त्यापेक्षा हे योगदान श्रेष्ठ आहे याचा विसर पडून ही भाट मंडळी पंकजा मुंडेंच्या मुस्कटदाबीला प्रेरीत करीत आहे.याचीही जाणिव पंकजा मुंडे यांना नक्कीच आहे म्हणूनच तुर्तास वेगळा विचार या भाटांच्या पथ्यावर आयता पडू द्यायचा नाही या इराद्यानेच त्यांनी दिल्ली सोडली असावी. पंकजा मुंडे यांच्या वाट्याला आलेले हे प्राक्तन त्यांनी धर्मयुध्द म्हणून संबोधले आहे,या धर्मयुध्दात पांडवांनी दाखवलेला संयम कार्यकर्त्यांसमोर ठेवून सोसता येईल तेव्हढं आणखी सोसण्याचे आवाहन केले आहे.त्याचवेळी त्या नरेंद्र मोदी टीमच्याच सदस्य असल्याचेही त्यांनी एका वक्तव्यातून सुचीत केले आहे.आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे, असे म्हणत माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे,या वक्तव्यातून महाराष्ट्रातील भाजपात वरचढपणा दाखवणाऱ्या देवेंद्र टीमलाही सुचक इशारा दिला आहे.विद्यमान पेचप्रसंगाची धर्मयुध्दाशी तुलना करतांना आपली बाजू पांडवांची आहे,हेही सुचक शब्दात सांगण्याची युक्ती योजताना भाजपाच्या अंगणात कारस्थान करणारे कौरवही त्यांनी प्रकाशझोतात आणले आहेत.एकूणच हे बंड शमले असे वाटत असले तरी पंकजा मुंडे यांच्याच विधानातील स्वल्पविराम या शब्दात असलेला गर्भित इशारा नव्या बंडाची पेरणी करून गेला असल्याने त्याला केंव्हा अंकूर फुटेल याची हमी आज देणे शक्य नाही.

COMMENTS