फलटणचे रेमडिसिव्हीरप्रकरणी प्रांताधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

Homeमहाराष्ट्रसातारा

फलटणचे रेमडिसिव्हीरप्रकरणी प्रांताधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी

येथील सुविधा हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयकडून चढ्या दराने रेमडिसिव्हर इंजेक्शनची विक्री झाल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सातारा व अन्न औषध प्रशासन तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यातुन तसा उल्लेख केला होता.

तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | DAINIK LOKMNTHAN
कबीर सिंग फेम निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला | LokNews24
स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  

फलटण / प्रतिनिधी : येथील सुविधा हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयकडून चढ्या दराने रेमडिसिव्हर इंजेक्शनची विक्री झाल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सातारा व अन्न औषध प्रशासन तसेच फलटण शहर पोलीस ठाण्यातुन तसा उल्लेख केला होता. या अनुषंगाने त्या वॉर्ड बॉयचे वृत्त सर्वच वर्तमानपत्र यांनी प्रसिध्द केले होते. त्याचा तपास सुरू असताना फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी यामध्ये हस्तक्षेप करत तपासाची दिशा भटकवण्याचा प्रयत्न केल्याने व वर्तमानपत्र तसेच पत्रकारांची बदनामी केल्याने प्रांतांविरोधात जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाणे व जिल्हा औषध प्रशासन यांनी मिळालेल्या माहितीनुसार रेमडिसिव्हर इंजेक्शन चढ्या दराने विक्री होत आहे. अशी माहिती मिळाली यावरून कारवाई केली. यामध्ये येथील सुविधा हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय सापडला. या वरून जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय सातारा यांनी याबाबतची माहिती सर्व वर्तमानपत्र यांना दिली. त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यातून एक प्रसिध्दी पत्रक काढले. या मध्येही सुविधा हॉस्पिटलचा वॉर्ड बॉय आहे अशी माहिती दिली. या वरून सर्व वर्तमानपत्रात याचे वृत्त प्रसिध्द झाले. या नंतर फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व त्यांच्या टीमने रात्रभर जागून अजून या मध्ये कोणकोण सहभागी आहे. याची माहिती घेत परत चौघांना ताब्यात घेतले. असे एकूण आठ जणांना न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा औषध प्रशासन व पोलीस अधिकार्‍यांनी हे प्रकरण तडीस न्यायचे असा चंग बांधला असताना तपासाची दिशा भटकवण्यासाठी फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी हॉस्पिटलला क्लिनचिट दिली. तसेच हे खापर प्रसार मध्यमांवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियावर केला. याचा चांगलाच समाचार पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतला. या रेमडिसिव्हर प्रकरणात अनियमितता झाल्याने या मध्ये स्वतःप्रांत कार्यालय अडचणीत येणार आहे.

COMMENTS