Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फरार असलेला गुंड बाळा दराडे अखेर जेरबंद

गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला व पन्नास हजार रुपयांचे बक्षिस असलेला गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे.

 बुलढाण्यात भाजप कडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत केली निदर्शने 
स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेला व पन्नास हजार रुपयांचे बक्षिस असलेला गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

नाशिक मध्ये बारामती तालुका पोलिसांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. दराडे याने पुणे, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात दहशत माजवली होती. पिस्तुलांची तस्करी करून युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात आणण्याचा उद्योग तो गेल्या काही वर्षांपासून करत होता. त्यामुळे दराडे गँग या भागात दहशत निर्माण झाली होती. एमआयडीसीतल्या व्यापाऱ्यांना, उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे याशिवाय चोरी, दरोडा, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि भिगवण परिसरात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मात्र कोणत्याही गुन्ह्यात त्याला अद्याप अटक झालेली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना चकमा देत तो राज्यात विविध भागात लपून राहत होता.

COMMENTS