फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…

प्रतिनिधी : पुणेमहाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला देऊ

नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी सूचना मागविण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश
चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाईफेक
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा

प्रतिनिधी : पुणे
महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, गृह खाते राष्ट्रवादीच्या वाट्याला देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा प्रश्न पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत,

ते १०० अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका. अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती.’ असा दावाही त्यांनी केला.

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबाबत मोठे विधान केले.

देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते १०० अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात. फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असे खळबळजनक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी गृह खात्याबाबत अजून एक खळबळजनक दावा केला.

COMMENTS