फटाके न वाजविता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा केला संकल्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फटाके न वाजविता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा केला संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)-  पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजविता प्रदुषणमुक्त दिवाळी

आमच्याकडे एकापेक्षा एक सरस जाधव ; मंत्री थोरातांचा भास्कर जाधवांना टोला
’तनपुरे’च्या संचालकांची चौकशीचे खंडपीठाचे आदेश
नरहरी सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फटाके न वाजविता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांना फटाकेमुक्तीची शपथ देण्यात आली. नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये फटाक्यांची कुतूहलता व आनंदाची पर्वणी असताना, कोरोनाच्या संकटकाळात पर्यावरणाचे पटलेले महत्त्व व फटाक्यामुळे निर्माण होणार्‍या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पर्यावरणपुरक दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांनी निर्धार केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना वायू व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे व वंचित घटकांना मदत करण्याचे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, सुभाष जाधव, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

 काशीनाथ पळसकर यांनी फटाक्यांच्या ध्वनी व वायू प्रदुषणामुळे आरोग्यावर व पर्यावरणावर होणारे दुष्परिणामाची माहिती दिली. पै.नाना डोंगरे यांनी दिवाळी हा अंधकार दूर करणारा सन आहे. समाजात पर्यावरणाचा समतोल ढासळला असून, हा अंधकार जागृकतेने दूर होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना ऑक्सिजनचे व पर्यावरणाचे महत्त्व कळाले असून, यासाठी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS