प्रतिनिधी : बीडमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील राजीव गांधी चौक पर
प्रतिनिधी : बीड
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत आदरांजली वाहिली.
यावेळी मुंडे म्हणाले की, तत्कालीन फडणवीस सरकारनं केवळ घोषणाबाजी केली. मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या विधानावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली.
धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे मी केवळ विनोद म्हणून पाहते. हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनीही हसायला हवे होते, असा टोमणा प्रीतम मुंडे यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त
बीड जिल्हा भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला.
बीडमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज साजरा करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
त्याचबरोबर पोलीस मुख्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणही मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीनं तीन राउंड फैरी झाडत हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनीही पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
COMMENTS