प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी : त्रिपुरा येथे झालेल्या हिंदू-मुस्लिम वादाच्या कथित घटनेसंदर्भात रझा अकादमीच्यावतीने अहमदनगर शहर बंद ठेवण्यात आले होते. यावेळी अका

वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कोतवालीची कारवाई
BREAKING: आता नगरमधील २६ खासगी रुग्णालयांची लूटमार थांबणार, रुग्णांना दिलासा | Lok News24
जामखेडमध्ये चोरट्यांनी डोके काढले वर

अहमदनगर/प्रतिनिधी : त्रिपुरा येथे झालेल्या हिंदू-मुस्लिम वादाच्या कथित घटनेसंदर्भात रझा अकादमीच्यावतीने अहमदनगर शहर बंद ठेवण्यात आले होते. यावेळी अकादमीचे नगर शहर अध्यक्ष शाबीर अली सय्यद (राहणार सिव्हिल हडको,सावेडी) यांनी 40 ते 45 जणांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन केले. यावेळी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी या निषेध आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की त्रिपुरामध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम कथित घटनेसंदर्भात रझा अकादमीच्यावतीने अहमदनगर शहरातील काही भागात मागील शुक्रवारी बंद ठेवण्यात आला होता. यावेळी अकादमीचे नगर शहर अध्यक्ष शाबीर अली सय्यद यांनी तसेच सर्फराज जहागीरदार, प्रतीक बारसे(रा.केडगाव), शाहबुरान फैसन शेख (राहणार तख्ती दरवाजा, नगर), शहाबाज शेख ऊर्फ बॉक्सर (राहणार कोठला, नगर), सय्यद खालील अब्दुल करीम (रा.मुकुंदनगर), आबिद हुसेन (रा.पांचपीर चावडी, नगर), सलीम जरीवाला (रा. पीरशाह खुंट,नगर), अल्तमश जरिवाला (राहणार पीरशाह खुंट), शरीफ सय्यद (राहणार बुरूड गल्ली, अहमदनगर), गालिब साबिर अली सय्यद (राहणार सिव्हिल हडको, सावेडी), नईम सरदार (राहणार रामचंद्र खुंट,नगर), फिरोज पठाण (राहणार रेल्वे स्टेशन, नगर), अजीम नूर मोहम्मद राजे (राहणार तांबटकर गल्ली, नगर), असद इराणी (राहणार झेंडीगेट, नगर), इम्रान बागवान (रा.धरती चौक, नगर), मौलाना अबिद रजा (राहणार नालबंद खुंट, नगर), अशरफ शेख (राहणार खिस्त गल्ली) व इतर 20 ते 25 जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर निषेध आंदोलन केले व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियावर मुलाखत देताना शाबिर अली सय्यद यांनी प्रक्षोभक वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण होऊन एकोपा टिकण्यास बाधा निर्माण केली तसेच इतर लोकांनी यावेळी प्रोत्साहन दिले म्हणून कोतवाली पोलिस ठाण्यात सुमारे 40 ते 45 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 153, 153 (अ) 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS