पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.

महापालिकेच्या स्मशानभूमीतील शवदाहिणीचा स्फोट | LOKNews24
शिक्षक मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी घसरणार : सचिन झगडे
संगमनेरात पोलिस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

राजूर प्रतिनिधी: अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्याने शनिवारी दि. ५ जून रोजी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब दगडू आघाव असे या पोलीस कॉन्स्टेबल आरोपीचे नाव आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ३० मे २०२१ रोजी आरोपी याने फिर्यादीशी मैत्री करण्याचे बोलून तिचा हात धरला व तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारून तिचा विनयभंग केला. यास फिर्यादी पोलीस कर्मचारी महिलेने विरोध केला असता आरोपी तिला म्हणाला की, या प्रकाराबाबत कोणाला काही एक सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून आरोपी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दगडू आघाव राजूर याच्याविरोधात भा.द.वि. कलम ३५४ (अ) व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व संगमनेर पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी राजूर पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली. यामधील आरोपी फरार असल्याचे समजते

COMMENTS