पोलीस खात्याची प्रतिमा डागाळू न देता व्यापक समाज हित साधणारे नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचा आहे.कार्यकाल पुर्ण झाला नसतांना त्यांची बदली होते
पोलीस खात्याची प्रतिमा डागाळू न देता व्यापक समाज हित साधणारे नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचा आहे.कार्यकाल पुर्ण झाला नसतांना त्यांची बदली होते म्हणून नाशिक जिल्ह्याची जनता नैराश्यातून असंतोषाकडे आणि असंतोषातून जनआंदोलनाकडे झुकली आहे.पोलीस अधिकाऱ्यासाठी जनतेने रस्त्यावर यावे असे कुठले महतकार्य या पोलीस अधिक्षकांनी केले आहे ,असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रातून विचारला जात आहे. गृहविभागही जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडी पाहून अवाक झाला आहे,महाराष्ट्रात विविध ठिकाणी कर्तव्य बजावणारे अधिकारीही उत्सुकतेने परिस्थिती समजावून घेत घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये औत्सुक्य ताणले गेले आहे.या अधिकाऱ्याचे नक्की काम कसे आहे.त्यांचा उत्तराधिकारी म्हणून येणाऱ्या शहाजी उमाप यांना या जिल्ह्यातून विरोध होतो आहे का? होत असेल तर का? अशी नाना प्रश्नांची सरबत्ती सध्या सुरू आहे त्या प्रश्नांचा वेध घेऊन वास्तव समोर ठेवण्यासाठी हा दखल प्रपंच आहे.
एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीने सामान्य माणसाने हळहळ व्यक्त करणे तशी दुर्मीळातील दुर्मीळ बाब असते.असे भाग्य फार थोड्या अधिकाऱ्यांच्या नशिबी येते. त्यातही पोलीस अधिकारी म्हंटले तर असा योग जुळून येणे महा कठीण.नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या समर्थनार्थ उभे राहत असलेले जन आंदोलन पाहील्यानंतर पोलीस खात्याविषयीची प्रतिमा जनमानसात झपाट्याने बदलू लागल्याचे सकारात्मक चित्र समाधान देणारे म्हणावे लागेल.शासनकर्त्यांनीही अशा वातावरणाला पोषक भुमिका घेऊन अगदी स्थापनेपासून काल परवा पर्यंत बदनाम ठरवले गेलेले हे खाते सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवण्यास सक्षम असल्याचे सिध्द करावे.
पोलीस अधिकारी आणि एकूणच पोलीस खात्याविषयी सामान्य जनतेत फार चांगली भावना दिसत नाही,त्याची अनेक कारणे आहेत.कायद्याबाबत जनतेत असलेले अज्ञान ,राज्य घटनेने नागरीक म्हणून बहाल केलेले मुलभूत अधिकाराविषयी असलेली अनभिज्ञता,ग्रामिण भागातील साक्षरतेचे विसंगत प्रमाण,विविध घटकांकडून सातत्याने होणारी दिशाभूल यामुळे पोलीसांविषयी विशेषतः ग्रामिण भागात नेहमीच नकारात्मक भावना जागविली जाते,यातून पोलीस आणि जनता यांच्या नेहमी खटके उडाल्याचे उदाहरणे पहायला मिळतात.पोलीस आपले हक्क डावलतात असाच समज खरे तर गैरसमज जनतेत निर्माण होतो.तो दुर करण्यासाठी कुणाकडूनही विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत.घटनेमागून घटना घडत जातात,निर्माण झालेली दरी रूंदावत जाते.गुन्हे दाखल होतात.पोलीस बदनाम होतो.जनता गुन्हेगार ठरते.फायदा कुणाच्याच पदरात पडत नाही.या परिस्थितीचा फायदा लाटणारे महाभाग दोन्ही बाजूला जीवंत होतात.मग त्यांची वळवळ सुरू होते.खाकी आणि खादी एकत्र येते.अनेक ठिकाणी खोट्या गुन्ह्यांचे अस्र वापरून,पोलीस मॕन्यूअल पायदळी तुडवून सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रिद काखेत गुंडाळून अवघे जनहित बळी दिले जाते.अशी पोलीस खात्याची प्रतिमा निर्माण झाली आहे.या प्रतिमेला सुधारण्याचा वाव शोधून प्रसंगानुरूप निर्णय घेतांना जनहित बाधीत होणार नाही पण कर्तव्यही निभावता येईल अशी काही माणसंही पोलीस खात्यात आहेत,या महानुभवांच्या असण्याने पोलीस खात्याची इभ्रत खरेतर टिकून आहे,या महानुभवांच्या प्रामाणिकपणातूनच पोलीस खात्याची प्रतिष्ठा उजळून निघत आहे, आम्हाला ज्ञात असलेल्या विद्यमान अधिकाऱ्यांमध्ये नामोल्लेख करायचा झाला तर पोलीस महासंचालक संजय पांडे, सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल,हेमंत नगराळे राजवर्धन,कृष्णप्रकाश,कुलवंत कुमार सरंगल, रविंद्र कुमार सिंघल,विश्वास नांगरे पाटील,दीपक पांडे,रजनीश शेठ,अंकुश शिंदे,बी,जी.शेखर,मनोज पाटील,प्रविण पाटील,पी.पी.पाटील,लक्ष्मीकांत पाटील,स्वामी,गणेश शिंदे,विजय खरात,अमोल तांबे पौर्णिमा चौघूले,विजय मगर ,सचिन गुंजाळ अशी भली मोठी यादी आहे,आणखी अनेकांची नावेही या यादीत समाविष्ट करता येतील.या नावांमध्ये आणखी एक नाव हमखास समाविष्ट करावे लागेल ते म्हणजे कार्यकाल पुर्ण होण्याआधीच बदली झालेले नाशिकचे पोलीस अधिक्षक आयपीएस सचिन पाटील यांचे.या ठिकाणी नमूद केलेल्या नावांबाबत मतमतांतरे असू शकतात. शकतात.व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रवृत्ती या न्यायाने अनेकांना या नावांवर आक्षेपही असू शकतो,तथापी व्यक्तीगत कारणास्तव नाही तर एकूण व्यापक समाजहीताचा विचार करून कर्तव्य बजावतांना पोलीस खात्याची प्रतिमा कुठेही मलीन होणार नाही याविषयी खबरदारी घेणारे अधिकारी म्हणून महाराष्ट्रात ही नावे परिचीत आहेत.काही नावे एखाद दुसऱ्या चुकीमुळे वादग्रस्तही ठरले असातील पण तत्कालीक कारणांचा उलगडा झाल्यानंतर पश्चाताप व्यक्त करून प्रायाश्चित घेतांनाही आम्ही अनुभवले आहे.असो.थोडे विषयांतर झाले असले तरी मुळ मुद्दा पोलीस खात्याची प्रतिमा डागाळू न देता व्यापक समाज हित साधणारे नाशिकचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांचा आहे.कार्यकाल पुर्ण झाला नसतांना त्यांची बदली होते म्हणून नाशिक जिल्ह्याची जनता नैराश्यातून असंतोषाकडे आणि असंतोषातून जनआंदोलनाकडे झुकली आहे.पोलीस अधिकाऱ्यासाठी जनतेने रस्त्यावर यावे असे कुठले महतकार्य या पोलीस अधिक्षकांनी केले आहे ,असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्रातून विचारला जात आहे. गृहविभागही जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडी पाहून अवाक झाला आहे,महाराष्ट्रात विविध ठिकाणी कर्तव्य बजावणारे अधिकारीही उत्सुकतेने परिस्थिती समजावून घेत घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये औत्सुक्य ताणले गेले आहे.या अधिकाऱ्याचे नक्की काम कसे आहे.त्यांचा उत्तराधिकारी म्हणून येणाऱ्या शहाजी उमाप यांना या जिल्ह्यातून विरोध होतो आहे का? होत असेल तर का? अशी नाना प्रश्नांची सरबत्ती सध्या सुरू आहे त्या प्रश्नांचा वेध घेऊन वास्तव समोर ठेवण्यासाठी हा दखल प्रपंच आहे.शहाजी उमाप यांना नाशिक जिल्ह्यात विरोध होत आहे का? या प्रश्नाचे निराकरण करणे सर्वाधिक महत्वाचे आहे.नाशिक जिल्ह्याचा शहाजी उमाप यांना यत्किंचतही विरोध नाही.विद्यमान पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याइतकेच शहाजी उमाप हे देखील कडवे शिस्तप्रिय पोलीस अधिकारी आहेत.सचिन पाटील यांनी बसवलेली घडी ते सुरळीतपणे तेही पुढे येतील याविषयी सामान्य माणसाला शंका नाही,पण ती केंव्हा? सचिन पाटील यांचा कार्यकाळ पुर्ण होऊन त्यांची नियमानुसार बदली होईल तेंव्हा.चांगले काम केले म्हणून अवेळी बदली करण्याची सजा सचिन पाटील यांना मिळत असेल तर शहाजी उमाप यांनाही मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य कितपत मिळेल यावर नाशिककर साशंक आहेत.नाशिककरांसमोर सचिन पाटील यांच्या कामाची तेव्हढी जंत्री आहे,भविष्यात काय होईल यावर नाशिककरांचा विश्वास नाही,सचिन पाटील यांनी कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवली.अवैध धंद्यांना चाप लावला.रोलेट,हुक्का,रेव्ह पार्टी,गुटखा,गोवंश तस्करी रोखली.कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचे ते कामच आहे.त्याचे कुणी कौतूक करावे अशी अपेक्षाही पोलीस अधिकारी बाळगणार नाही,मात्र तरीही सचिन पाटील यांच्याविषयी जनमानसात आदराची भावना निर्माण होण्यामागे एक वेगळे खास कारण आहे.आज समाजात सर्वाधिक पिचलेला घटक कोणता असेल तर तो आहे शेतकरी.आई जेवण देत नाही,बाप भिक मागू देत नाही अशी या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. निसर्ग,बाजारातील दलाल आणि सरकार अशा तिन्ही घटकांच्या जाचाने मरणासन्न अवस्थेत जगणारा शेतकरी व्यापारी वर्गाकडूनही नागवला जात आहे.अशा या शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या मालाचे पैसे व्यापाऱ्यांनी बुडविल्याने अनेक कुटूंबांची अवस्था दयानीय झाली.त्यातच नाशिकचे तत्कालीन विशेषा पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर आणि नाशिक एसपी सचिन पाटील यांनी राबवलेल्या मोहीमेमुळे व्यापाऱ्यानी बुडीत काढलेले कोट्यावधी रूपये शेतकऱ्यांना मिळवून दिले,त्यानंतर विशेष पोलीस महानिरिक्षक निवृत्त झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी सचिन पाटील यांच्याकडे आशेने पाहू लागला.या आशेला न्याय देण्यासाठी सचिन पाटील यांनी ही मोहीम पुर्वीसारखीच सुरू ठेवून शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे परत करण्याची प्रक्रीया राबवली.आज अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रीया प्रवाहीत असतांना त्यांची अचानक झालेली बदली तमाम शेतकरी वर्गासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.यातून एक प्राकाराची निराशा जिल्ह्यात दाटून आली आहे,सचिन पाटील गेले तर आम्ही उध्वस्त होऊ या निराशेतून काही शेतकऱ्यांनी जीवन संपविण्याची भाषा सुरू केली आहे,दुर्दैवाने ही वेळ येऊ नये,महाविकास आघाडी सरकारच्या उज्वल कार्यपरंपरेला कलंक लागू नये.ही इच्छा आहे,हे सर्वस्वी मायबाप सरकारच्याच हातात आहे.अशा प्रतिक्रीया जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात झळकणाऱ्या होर्डींग्जमधून व्यक्त होतांना दिसतात. सामान्य जनताच नाही तर पोलीस दलातही या बदलीवर नकारात्मक भावना आहे.सचिन पाटील जिल्ह्यात रूजू झाले तेंव्हा कोव्हिडचे थैमान सुरू होते.पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे आरोग्य ऐरणीवर होते,त्यांच्यासाठी उभारलेल्या कोव्हिड सेंटरमधून तब्बल १७५ रूग्ण उपचार घेऊन ठणठणीतपणे कर्तव्य बजावत आहेत.या उपचार केंद्रात पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटूंब आई वडील एव्हढ्याच सदस्यांना उपचार करण्याचा शासकीय आदेश होता,तथापी व्यापक विचार करून सचिन पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे सासू सासरे बहिण मेव्हूणे या नात्यांचाही समावेश करून वेगळी मानवता दाखवली.अशा प्रकारची भावना आज पोलीस कर्मचारी बोलून दाखवीत आहेत,जे जे विधायक असेल तेते करण्यावर कुठलाही संकोच न बाळगणारे अधिकारी म्हणून सचिन पाटील यांची तत्परता आज प्रत्येकाच्या पोटातून ओठावर येत आहे.म्हणूनच त्यांच्या बदलीला विरोध करणारे जनआंदोलन उभे राहाताना दिसते आहे,जनतेला आंदोलन करण्याचा अधिकारआहे,म्हणून ते आंदोलान करू शकतात,आम्ही काय करायचे,आमचे हात बांधलेले आहेत.आम्ही आंदोलन करू शकत नाही,बोलू शकत नाही,असा तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करणाऱ्या भावना पोलीस कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होतात यातच सचिन पाटील यांच्या कामाची पावती मिळते.सुज्ञास अधिक सांगणे न लगे!
COMMENTS