पोलिसातील वाघ अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात…; अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक वाघला पोलिस कोठडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसातील वाघ अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात…; अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक वाघला पोलिस कोठडी

पोलिस खात्यातून निलंबित असलेला पोलिस निरीक्षक विकास वाघ याला अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात बसण्याची वेळ आली.

धारुर घाटात डॉ. आंबेडकर विकास मंचचा रास्ता रोको l LokNews24
युवान आयोजित प्रेरणा कार्यक्रमात यु.पी.एस.सी. मधील गुणवंतांचा गौरव
दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले

अहमदनगर/प्रतिनिधी-पोलिस खात्यातून निलंबित असलेला पोलिस निरीक्षक विकास वाघ याला अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात बसण्याची वेळ आली. महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वाघ याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची म्हणजे दि. 21 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

    कोतवाली पोलिस ठाण्याचा तात्कालिक पोलिस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्याविरोधात एका महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वाघ याच्यावर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान या महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात वाघविरुद्ध अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल केला होता. त्यात वाघ याने लाकडी दांडक्याने मारहाण करून व केस मागे घेण्यासाठी दमदाटी मारहाण करून अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक वाघ पसार झाला. त्याला शोधण्याचे प्रयत्न तोफखाना पोलिसांचे सुरू होते. अखेर तो नाशिकला असल्याची माहिती मिळाल्याने तोफखाना पोलिसांच्या पथकाने वाघ याला नाशिक येथून अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली.

ओळखीचा घेतला गैरफायदा

संबंधित महिला एक तक्रार देण्याच्या कारणावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गेली असता त्यावेळी त्या पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक असलेल्या वाघ याने तिच्याशी जवळीक साधून व ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. त्याबाबत तिने त्याच पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली होती व त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता. तो गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून त्याने नंतर तिला मारहाण केली व पुन्हा अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलिसात दाखल झाला आहे. यापैकी आता तोफखान्यात दाखल गुन्ह्यात त्याला अटक झाली आहे.

COMMENTS