पोलिसांस शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दुकानदारास अटक

Homeमहाराष्ट्र

पोलिसांस शिविगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दुकानदारास अटक

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सध्या सर्वत्र धुमाकुळ घातल्याने जिल्हाधिकार्‍यांचे संपुर्ण जिल्हाभर बंदी आदेश असताना दुकान का चालु ठेवले.

..या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे बिल झाले जमा ! LokNews2
नगरमधील रक्तचंदन तस्कर पुष्पावर कारवाई | LOK News 24
राजधानी एक्स्प्रेसला रेल्वे अधिकार्‍यांच्या भांडणामुळे विलंब

शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सध्या सर्वत्र धुमाकुळ घातल्याने जिल्हाधिकार्‍यांचे संपुर्ण जिल्हाभर बंदी आदेश असताना दुकान का चालु ठेवले. अशर विचारणा केल्याच्या कारणावरून प्रेमकुमार निवृृृती लोकरे (वय 27, मुळगांव विरळे, ता. शाहुवाडी, सध्या रा. खुजगांव, ता. शिराळा) याने कोकरूड पोलीस ठाण्याचे हवालदार अरूण नारायण मामलेकर (वय 32) यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करून मारहाण  केल्याप्रकरणी कोकरूड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दुकानदारास अटक करण्यात आली आहे. 

याबाबत कोकरूड पोलिसाकडून व घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रेमकुमार लोकरे यांच्या वडिलांचे वॉकमेट (अनिल फुटवेअर) नावाचे चप्पल विक्रीचे दुकान शेडगेवाडी येथील बाजार पेठेतील चौकात असून ते जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेश असताना चालू होते. हवालदार अरूण मामलेकर यांनी दुकान बंद करण्यास सांगितले असता प्रेमकुमार लोकरे यांनी दुकान बंद न करता शिवीगाळ करण्यास सुरवात करून त्यांना माराहाण केल्याची फिर्याद हवालदार मामलेकर यांनी कोकरूड पोलिसात दिली. त्यानुसार दुकानदारास अटक करण्यात आली असून अधिक तपास सपोनि ज्ञानदेव वाघ करत आहेत.

COMMENTS