पैठण- पंढरपुर पालखी महामार्गाची दुरावस्था… आधिकारी मस्त, ठेकेदार सूस्त, जनता त्रस्त:

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पैठण- पंढरपुर पालखी महामार्गाची दुरावस्था… आधिकारी मस्त, ठेकेदार सूस्त, जनता त्रस्त:

जामखेड : यासीन शेख  वारकरयांचा सांप्रदायिक मार्ग सुखकर व्हावा तसेच या मार्गावरील गावांचा विकास व्हावा यासाठी पैठण पंढरपुर पालखी महामार्ग (Pait

’होय मी व्यसनातून मुक्त होणारच’ पुस्तकाचे प्रकाशन
पोहेगाव पतसंस्थेला 2 कोटींचा नफा – नितीनराव औताडे
मनपा निवडणुकांतून ओबीसींचे होणार नुकसान; प्रा. शिंदे यांचा महाविकासवर ठपका

जामखेड : यासीन शेख 

वारकरयांचा सांप्रदायिक मार्ग सुखकर व्हावा तसेच या मार्गावरील गावांचा विकास व्हावा यासाठी पैठण पंढरपुर पालखी महामार्ग (Paithan – Pandharpur Palakhi Marg) क्रमांक ७५२ व्हावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. त्यानुसार केंद्र सरकारने २०१४ मध्ये २६० कोटी नीधीसह पालखी महामार्ग मंजूर केला.

जुलै २०१७ च्या वर्क आर्डर प्रमाणे तिरुपती कंट्रक्शन या कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मात्र आधिकारी- ठेकेदाराच्या संगनमताने व काही नागरिकांच्या अडमुठेपणामुळे विठ्ठलाच्या दारात जाणारया पालखी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले आहे. चार वर्षापासून रखडलेला हा पालखी महामार्ग त्रासदायक व हलाखीचा झाला आहे. 

जामखेड तालुक्यातून जाणारया पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गावरून संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. 

पाटोदा (जि बीड) (Patoda, Beed) मार्गे दिघोळ- खर्डा (ता जामखेड जि अहमदनगर) (Dighol- Kharda- Jamkhed) पर्यंत  दिघोळ गावात बाजारतळाजवळ, म्हसोबादरा, उन्हाळपाणी पुल (दिघोळ फाटा), मिसाळवस्ती, जोडअंबा (मोहरी)पुल, कान्होबाचा माळ (खर्डा)आदी भागात रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. 

सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही जनतेला वापरात रस्ता वापरता येत नाही. या महामार्गाच्या तक्रारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही केल्या आहेत.  राष्ट्रीय महामार्ग असल्याने आपलं कर्तव्य या नात्याने बीडच्या खा प्रितम मुंडे व अहमदनगरचे खा सुजय विखे यांनी महामार्गाच्या दयनीय अवस्थेची दखल घेण्याची गरज आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या गेल्या आहेत.गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याला व नागरिकांच्या गैरसोयीला जवाबदार कोण? 

COMMENTS