पुण्यासाठी ऑक्सिजन आणण्याचा तुघलकी आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यासाठी ऑक्सिजन आणण्याचा तुघलकी आदेश

पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने ऑॅक्सिजनची गरजही मोठी असताना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तुघलकी आदेश काढले आहेत.

ढोकरीकर परिवाराच्या सामाजिक बांधिलकीतून कर्जतमध्ये अग्निशमन केंद्र : खा. सुप्रियाताई सुळे
नेहरूंनी प्रतिष्ठेपायी गोवा पारतंत्र्यात ठेवला
पुणे प्रादेशिक सा.बां.विभागात निविदा घोटाळ्यांचा उच्चांक

पुणे/प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याने ऑॅक्सिजनची गरजही मोठी असताना अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तुघलकी आदेश काढले आहेत. पुण्यापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाकणऐवजी कर्नाटकातील बेल्लारी आणि रायगडमधील तळोज्यातून ऑॅक्सिजन आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

त्यामुळे पुण्याच्या ऑॅक्सिजन पुरवठ्यावर संकट येण्याची भीती आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या विरोधानंतरही हा बदल करण्यात आला. शुक्रवारी रात्री अचानक एफडीएने हे आदेश काढले आहेत. शनिवारी सकाळपासून हे नवे आदेश लागू झाले आहेत. आणि त्यानुसार ऑक्सिजनचे वाटप सुरू झाले आहे. एफडीएने पुण्यातील हॉस्पिटलला चाकण येथून होणारा ऑक्सिजन पुरवठ्याचा कोटा तब्बल 120 टनांनी कमी केला आहे. हा पुरवठा आता रायगड जिल्ह्यातील तळोजा आणि कर्नाटकातील बेल्लारी येथून होणार आहे. वाहतुकीचे अंतर आणि वेळ वाढून पुण्यात ऑॅक्सिजन संकट निर्माण होण्याची भीती आहे. पुण्यात दररोज 350 ते 380 टन ऑक्सिजनची मागणी असते. चाकण येथील चार ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांकडून ही गरज भागवली जात होती; मात्र चाकण येथून पुण्याला होणार्‍या या पुरवठ्यात बदल करण्यात आला आहे. नवीन ठिकाणावरून ऑक्सिजन आणण्यासाठी नव्याने टँकर व्यवस्था करावी लागणार आहे. प्रवासाचा वेळ वाढणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन वितरण विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यात ऑक्सिजन वाहतूक आणि वितरणाची असलेली व्यवस्था एफडीएच्या नव्या आदेशाने बदलली आहे.

COMMENTS