Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सापडले 138 कोटी सोन्याचे घबाड

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू असल्यामुळे पोलिस यंत्रणा देखील गाड्यांची झाडाझडती घेत आहेत. त्यातच खेड-शिवापूर येथे 5 कोटींची रोकड त

भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले
दिवाळीनिमित्त मिळणार शंभर रुपयांचा शिधा
नक्टीच्या लग्नाला सतरा इग्न. राष्ट्रीय महामार्गाचे काम काही होईना

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू असल्यामुळे पोलिस यंत्रणा देखील गाड्यांची झाडाझडती घेत आहेत. त्यातच खेड-शिवापूर येथे 5 कोटींची रोकड तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. कोल्हापूरच्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात तब्बल 138 कोटींचे सोने पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. तपासणीदरम्यान या पांढर्‍या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापार्‍याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

COMMENTS