पुण्यात राष्ट्रवादी करणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’… अनेक जण परतणार स्वगृही…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रवादी करणार भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’… अनेक जण परतणार स्वगृही…

प्रतिनिधी : पुणे2022 च्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे . ज

संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णय LokNews24
लालबागच्या राजाला 26 कोटीचे विमा संरक्षण
पुण्यात महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी

प्रतिनिधी : पुणे
2022 च्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा निर्धार नेत्यांनी केला आहे . जिंकून येणाऱ्यांनाच पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याचे नेते सांगत असले, तरी पक्षप्रवेशाने कार्यकत्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे .

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. पुण्यात पक्षवाढीसाठी सर्व राजकीय नेते तयारीला लागले आहे . गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाकाच लागला .

सध्या भाजपचे नगरसेवक असलेले, परंतु पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नगरसेवक स्वगृही परतणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. मागील महिन्यात पक्षाचे दोन वेळा पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्या कार्यक्रमात माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधले .

तर दुसऱ्या कार्यक्रमात माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका वैजयंती पासलकर, शांतिलाल सुरतवाला यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला .

2017 च्या निवडणुकीत भाजपने सर्व नितींचा वापर करत महापालिकेवर सत्ता मिळवली होती . त्याची परतफेड करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी रणनीती आखली आहे .

COMMENTS