पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची होणार रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात येणाऱ्या प्रत्येकाची होणार रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट

शहरात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

Mumbai : कपड्याच्या गोदामाला भीषण आग | LOKNews24
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार विठ्ठल -रखुमाईची पूजा
काँगे्रस गळती रोखणार कशी ?

पुणे : शहरात एसटी, रेल्वे तसेच खासगी बसने शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठीचा खर्च संबंधित आस्थापना अथवा प्रवाशांनी करणे बंधनकारक असणार आहे. महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी शासनाच्या लॉकडाऊनच्या आदेशानुसार हे आदेश काढले आहेत. 

तर, खासगी बस प्रवासी कंपन्यांना 50 टक्‍केच प्रवासी क्षमता बंधनकारक असणार असून, या नियमाचे उल्लंघन झाल्यास चालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. राज्यात जिल्हाबंदी लागू असली, तरी खासगी बस, एसटी, तसेच रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या कोरोनाबाधितांना अटकाव घालण्यात येणार आहे. त्यासाठी हे प्रवासी ज्या स्थानकावर उतरतील, त्याच ठिकाणी त्यांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केली जाणार आहे.

COMMENTS