पुण्यात गणेश विसर्जनासाठी कडक निर्बंध… अजितदादांची माहिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात गणेश विसर्जनासाठी कडक निर्बंध… अजितदादांची माहिती

प्रतिनिधी : पुणेराज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्य

बुलढाण्यातील म्हाडा कॉलनीत बिबट्याचा वावर
राष्ट्रपतींच्या दौ-यात दोघांचा बळी l DAINIK LOKMNTHAN
शासकीय ग्रंथालयाच्या अनुदानात होणार 60 टक्के वाढ

प्रतिनिधी : पुणे
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. गणपती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी विसर्जनादिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार आहेत. मृत्युदर कमी झाला, रुग्ण वाढ कमी झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर २ ऑक्टोबरला नवा निर्णय घेऊ, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून पोलिसांकडून उत्सवासाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. प्रादुर्भाव वाढू नये म्हणून विसर्जनाच्यादिवशी हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहीती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

COMMENTS