Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई

पुणे : नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली

लेडी डॉन, समीर वानखेडे कनेक्शन? दुबई, मालदीवमधील फोटो मलिकांनी केले शेअर
कर्जास कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या | DAINIK LOKMNTHAN
दाऊदचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी| LOKNews24

पुणे : नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, एका बिगर बँकिंग वित्तसंस्थेला (एनबीएफसी) दंड ठोठावण्यात आला आहे.

पुण्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेला नागरी सहकारी बँकांशी संबंधित नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन लाख रुपयांचा आणि अन्य एक मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांच्या केवायसीसंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आल्याचे आरबीआय सूत्रांनी सांगितले. याशिवाय बिगर बँकिंग वित्तसंस्था (एनबीएफसी) गटातील तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथील सेयाद शरियत फायनान्स लिमिटेडला पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या केवायसीसंबधी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

COMMENTS