पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात शिक्षक दिन ऑनलाईन पध्दतीन

अहमदनगरमध्ये नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहनI LOK News24
Ahmednagar : अहमदनगर मधून फाईव्ह जी मोबाईल टॉवरला विरोध | LokNews24
पत्नीला चक्क पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना| LOK News24

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयात शिक्षक दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रा. सौ. अनुपमा बागल देवकर ता. करमाळा, जि. सोलापूर या होत्या. शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. सौ. बागल देवकर म्हणाल्या की विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील परस्पर संबंध विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडविण्याच्या दृष्टीने खुप महत्वाचे असतात. विद्यार्थ्याने शिक्षणाचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आपल्या शिक्षणाचा वापर स्वतः बरोबरच समाजाच्या कल्याणासाठी केला पाहिजे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बनारस व कोलकता येथील विद्यापीठाचे कुलगुरु असतांना सुध्दा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले व त्यामुळे चांगले युवक तयार झाले असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी डॉ. मिलिंद अहिरे आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थी-शिक्षक यांच्यामधील संबंध फार महत्वाचे असून शिक्षक वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच ते कधी कधी रागवतात. यामागे आपला विद्यार्थी चांगल्या पध्दतीने घडावा हाच उदेद्श असतो. विद्यार्थ्यांमुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे होत असते व त्यासाठी महाविद्यालयाचे शिक्षक कायम काम करत असतात असेही त्यांनी यावेळी बोलतांना आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयात नव्याने रुजु झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपली ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली.

यामध्ये सहयोगी प्राध्यापक डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. सखेचंद अनारसे, डॉ. मनोज गुड, डॉ. प्रेरणा भोसले, प्रा. किर्ती भांगरे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. अनारसे यांनी करुन दिली. यावेळी प्रज्ञा घुले, समिक्षा अव्हाळे, अक्षता अन्नदाते, मानसी पाटील, विकास पोखरकर व महेश जाधव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली पोंदे यांनी तर आभार सौ. अंजली देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षक व विद्यार्थी असे एकुण 100 पेक्षा जास्त संख्येने ऑनलाईन पध्दतीने हजर होते.

COMMENTS