Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू

सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडून आला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौज

बुलडाण्यातील अपघातात एकाचा मृत्यू
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली, ६ भारतीयांसह ७ जणांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडून आला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी परिसरात झालेल्या या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पनवेल येथून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेली एरटीका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कारमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला असे एकूण सहा प्रवासी होते. हे सर्व प्रवासी परस्पर मित्र असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर 7, पनवेल, जि. रायगड) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह वाहनात अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. अपघातानंतर कार रस्त्यापासून सुमारे दहा ते पंधरा फूट अंतरावर झुडपात फेकली गेली होती, यावरून अपघाताची तीव्रता स्पष्ट होते. दरम्यान, मृत व जखमींची सविस्तर माहिती संकलित करण्यासह अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. या भीषण घटनेमुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS