पुणे महापालिका सरसकट लसीकरण करण्यास तयार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे महापालिका सरसकट लसीकरण करण्यास तयार

शहरात सध्या २३ हजार सक्रिय रुग्ण असून, दररोज सरासरी २८०० ते ३००० या संख्येने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

प्रियांका चोप्राने शेअर केली मुलगी मालतीची पहिली झलक
अमित ठाकरे यांनी घेतला सोलापुरी हुरड्याचा आस्वाद
चांद्रयान प्रक्षेपणाचा युट्यूबवर नवा विक्रम

पुणे : शहरात सध्या २३ हजार सक्रिय रुग्ण असून, दररोज सरासरी २८०० ते ३००० या संख्येने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. चाचण्यांसाठी येणारा खर्च हा लसीकरणापेक्षा अधिक असल्याने पुणेकरांचे लसीकरण करणे महापालिकेला आणि नागरिकांनाही आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. त्यात करोनाची बाधा झाल्यानंतर नागरिकांना द्यावे लागणारे उपचार, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा खर्चही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सरसकट लसीकरण करण्यास तयार आहे. 

तीस लाख पुणेकरांना लसी द्यायची म्हटली, तरी सुमारे ५० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च उचलणे महापालिकेला शक्य आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते आणि महाालिका आयुक्त या दोघांनीही पुणेकरांना सरसकट लसीकरणास परवानगी देणे आणि त्यासाठीची लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.’पुणे शहरात सध्या करोनाच्या नवीन विषाणूविरुद्ध लढा सुरू आहे. या आजाराच्या रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता पुण्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना करोनाची लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे,’ असे बीडकर म्हणाले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची परवानगी दिल्यास याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पालिकेच्या वतीने आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS