पुणेकरांना अजितदादांचा आठवड्याचा अल्टिमेटम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणेकरांना अजितदादांचा आठवड्याचा अल्टिमेटम

पुण्यातील परिस्थिती फार गंभीर असून लोकांना मुखपटी, सामाजिक अंतर भान ठेवावे लागणार आहे.

अखेर मुलीला शाळेत सोडणे राहूनच गेले…
“औकातीत राहा”; रवींद्र जडेजाची पत्नी संतापली
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे/प्रतिनिधीः पुण्यातील परिस्थिती फार गंभीर असून लोकांना मुखपटी, सामाजिक अंतर भान ठेवावे लागणार आहे. पुण्यात कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला. 316 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर पुढील शुक्रवारी टाळेबंदीचा निर्णय घेणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.  

आढावा बैठकीनंतर पत्राकर परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की एक एप्रिलपासून जे काही कार्यक्रम आहेत, जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे; संख्या 50 पेक्षा जास्त असता नये. अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, असेच पुढील पाच-सहा दिवस सुरू राहिले तर दोन एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील. लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू टेवावे.  मॉल, मार्केट, चित्रपट गृहात 50 टक्के उपस्थिती ठेवावी. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवण्यात येईल. ऑक्सिजन प्लँट चाकणजवळ झाला आहे. त्यामुळे पुरवठा सुरळीत आहे. ऑक्सिजन कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहोत. पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर एक एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार आहोत. ससूनमध्ये तीनशेऐवजी  ऐवजी पाचशे कोविड बेड करणार असल्याचे सांगताना अजित पवारांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला ब्रेक करायचे असेल तर टाळेबंदीला पर्याय नाही, असे म्हटल्याने टाळेबंदी होण्याची शक्यता आहे. 

COMMENTS