अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व भांडगाव शिवारादरम्यान मंगळवारी (9 नोव्हेंबर) सकाळी जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. 1970च्या दशकातील हा बॉम
अहमदनगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील भाळवणी व भांडगाव शिवारादरम्यान मंगळवारी (9 नोव्हेंबर) सकाळी जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. 1970च्या दशकातील हा बॉम्ब असण्याची शक्यता आहे. लष्कराचे पथक या ठिकाणी येणार असून यानंतरच याचा उलगडा होणार आहे. भाळवणी येथील शृंगऋषी डोंगराच्या पायथ्याशी निलेश चेमटे यांची जमीन आहे. ते शेताजवळ गेले असताना त्यांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली. हा बॉम्ब साधारण सहा सेंटीमीटर लांब तसेच 500 ग्रॅम वजनाचा असण्याची शक्यता आहे. या परिसरात सन 1970 च्या दशकातील जिवंत बॉम्ब यापूर्वीही आढळून आला होता. लष्कराच्या पथकाने तो निकामी केला होता. अशाच प्रकारचा बॉम्ब पुन्हा आढळून आल्याने चेमटे यांनी ही बाब भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत रोहोकले यांना सांगितली. त्यांनी याची माहिती जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्ष (भारतीय सेना) यांना दिली. त्यामुळे लष्करी पथक या ठिकाणी दाखल होणार असून त्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. तोपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
COMMENTS