पाथर्डी शहरात भरदिवसा धाडसी चोरी ; तालुक्यात पोलिसांचे अस्तित्व दिसेना

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पाथर्डी शहरात भरदिवसा धाडसी चोरी ; तालुक्यात पोलिसांचे अस्तित्व दिसेना

पाथर्डी/प्रतिनिधी : शहरातील वामनभाऊनगर परिसरातील पसायदान कॉलनी येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर गर्जे यांच्या राहत्या घरी रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्

गोदावरीच्या उजव्या कॅनालमध्ये बुडून वृद्धाचा मृत्यू
नवोदय परीक्षेत श्रुतिका झगडेची निवड
मळगंगा देवीच्या यात्रेला उत्साहात सुरूवात

पाथर्डी/प्रतिनिधी : शहरातील वामनभाऊनगर परिसरातील पसायदान कॉलनी येथील रहिवाशी असलेले ज्ञानेश्वर गर्जे यांच्या राहत्या घरी रविवारी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत रोख रक्कम व सोने असा एकूण २ लाख पंचवीस हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला असून, पाथर्डी पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.;दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती मोटरसायकलवर त्या परिसरात फिरताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की,ज्ञानेश्वर गर्जे हे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी पावणे नऊ वाजता त्यांच्या गावाकडे गेले असता पुन्हा ते सायंकाळी ४ वाजता घरी आले त्यावेळी त्यांना घरातील सामानाची,कपाटाची उचकापाचक झाल्याचे आढळले.तसेच घराच्या पाठीमागील बाजूच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून कोणी तरी घरात आले असल्याचे निदर्शनास आले.

COMMENTS