पाथर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ५७ लाखाचा गांजाचा अमली पदार्थ जप्त..

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ५७ लाखाचा गांजाचा अमली पदार्थ जप्त..

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतातुन बाहेरून आलेला ७२१.१४२ किलो ग्रम वजनाचा गांजाच्या अमली पदार्थ रविवारी सकाळी पोलिस

राहाता शहरामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात
कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी
रेमडेसिविर च्या वापरामुळे अनेक रुग्णांवर झाले दुष्परिणाम | पहा १२ च्या १२ बातम्या | LokNews24

अभिजित खंडागळे/ पाथर्डी : तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतातुन बाहेरून आलेला ७२१.१४२ किलो ग्रम वजनाचा गांजाच्या अमली पदार्थ रविवारी सकाळी पोलिसांनी पकडला असुन त्यांची किंमत अंदाजे ५७ लाख ६९ हजार १३६ रुपये इतकी आहे.सदर कारवाई पाथर्डी पोलीस ठाणे,शनिशिंगणापूर पोलीस ठाणे व सोनई पोलीस ठाणे यांनी संयुक्तपणे केली आहे. या कारवाईत गांजाची राखण करणाऱ्या सुमन साहेबराव आवाड (वय ४० रा.शंकरवाडी),सावित्रीबाई बापू आवाड (वय ६५ रा.शंकरवाडी) या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच त्यांच्याकडे चौकशी केली असता हा गांजाचा साठा नारायण भालके (पूर्ण नाव माहीत नाही),बाळासाहेब उर्फ बबन दहातोंडे (पूर्ण नाव माहीत नाही) दोघे रा.चांदा ता.नेवासा यांचा असून त्यांनी तो आमच्या शेतात ठेवून बापू आवाड, साहेबराव आवाड, गोरख आवाड, विलास आवाड सर्व राहणार शंकरवाडी यांच्याकडे राखण करण्यास दिला असल्याची माहिती दिली. ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या सूचनेनुसार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल,ज्ञानेश्वर भोसले,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,अनिल बडे,देविदास तांदळे,एकनाथ बुधवत,पोपट आव्हाड,प्रतिभा नांगरे ,संजय बडे,सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नवगीरे,राठोड काळे आदी जण सहभागी झाले होते. सदरील कारवाई नंतर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

COMMENTS