पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?

पाथर्डी तालुक्यात कोरोना महामारीला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असून,आज तालुक्यात नवीन १३६ रुग्ण आढळलेले आहेत.

संजयनगरचा कत्तलखाना आरोग्यास धोकादायक- नगराध्यक्ष वाहडणे
प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

अभिजित खंडागळे /पाथर्डी : पाथर्डी तालुक्यात कोरोना महामारीला सुरवात झाल्यापासून पहिल्यांदाच २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली असून,आज तालुक्यात नवीन १३६ रुग्ण आढळलेले आहेत.

तालुक्यात गेल्या ६ दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.परंतु प्रशासन सुस्त झाले असून नागरिक मस्त होऊन गावात फिरताना दिसत आहेत.मुख्यमंत्र्यांनी राज्यात रात्री  ८ नंतर संचारबंदीचे आदेश दिले असताना देखील ते नागरिकांकडून गांभीर्याने पाळले जात नसल्याने व प्रशासन ही कठोर पाऊल उचलत नसल्याने तालुक्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे.
वरिष्ठ यंत्रणेकडून काही आदेश आला की एक दोन दिवस प्रशासन ऍक्शन मूड मध्ये येत फोटोसेशन करत पुन्हा सुस्त होत असल्याचे सध्या पहावयास मिळत आहे.तसेच नागरिक ही प्रशासनाला सहकार्य करत नसल्याने आज या रूग्णवाढीस जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

COMMENTS