पाथर्डी तालुक्यातुन उसाच्या शेतातून पोलिसांनी केला लाखो रुपयांचा गांजा जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी तालुक्यातुन उसाच्या शेतातून पोलिसांनी केला लाखो रुपयांचा गांजा जप्त

अभिजित खंडागळे/पाथर्डी : तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपून ठेवलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पाथर्ड

अहमदनगरमध्ये नारायण राणेंच्या प्रतिमेचे दहनI LOK News24
अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24

अभिजित खंडागळे/पाथर्डी : तालुक्यातील शंकरवाडी येथील उसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपून ठेवलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पाथर्डी पोलीस ठाणे,शनिशिंगणापूर पोलीस ठाणे व सोनई पोलीस ठाणे यांनी रविवारी सकाळी संयुक्त कारवाई करत तेथिल लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे;दरम्यान त्या गांजाची राखण करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून वरिष्ठांच्या सुचनानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

ही कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत उपअधीक्षक सुदर्शन मुंढे,पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण,सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल,ज्ञानेश्वर भोसले,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,अनिल बडे,देविदास तांदळे,एकनाथ बुधवत,पोपट आव्हाड,प्रतिभा नांगरे आदी जण सहभागी झाले होते.

COMMENTS