पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात देशाला हादरून टाकणारा भ्रष्टाचार
वंचितच्या पदाधिकार्‍यावरील खोटे गुन्हे मागे घ्या
Ahmednagar : तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणी वाढल्या…. कर्मचारी आक्रमक l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाच्यावतीने मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, महिला आघाडी प्रमुख वैशाली नाडकर्णी, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वषार्र् गायकवाड यांना दिले आहे. 

मागील महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढले आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा या अगोदरच पुढे टाकण्याबाबत निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मनातील भीतीचे वातावरण कमी केल्याबाबत शिक्षक परिषदेने या निर्णयाचे स्वागत करून सरकारला धन्यवाद दिले आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी व वैद्यकीय विभागाच्या होणार्‍या प्रवेश परीक्षांबरोबरच अन्य परीक्षाही पुढे ढकलण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. मात्र, 23 मे रोजी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. या शिष्यवृत्ती परीक्षा यानंतर घेतल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या परीक्षा जून किंवा जुलैमध्ये घेऊन त्याच वर्षापासून शिष्यवृत्ती देता येऊ शकता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

COMMENTS