पहिली ते आठवीच्या विद्यार्थी होणार परीक्षेविना पास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहिली ते आठवीच्या विद्यार्थी होणार परीक्षेविना पास

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्यात येणार आहे.

नाकर्त्या ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड : राम शिंदे
देहरे परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
डेव्हिड वॉर्नरची कसोटी-वनडेमधून निवृत्तीची घोषणा

मुंबई/प्रतिनिधी : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली. ’पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे,’ असे सांगून गायकवाड म्हणाल्या, की आपण कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणावर भर दिला.

विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आपण विविध माध्यमातून प्रयत्न करत होतो; पण आता कोरोनाची परिस्थिती पाहता आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देणार आहोत. राज्यात कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मूल्यमापन संदर्भात मी आज आपल्याशी बोलणार आहे. मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गूगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा या वर्षात आपण सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या; परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या, त्या ठिकाणीदेखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो, की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावे आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, असे त्या म्हणाल्या. आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, खरेतर या मुलांचे वर्षभराचे मूल्यमापन बघितले पाहिजे; परंतु यंदाची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे यंदा हे होणे शक्य नाही. म्हणून आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत, की राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थी आहेत, शिक्षण हक्क अधिकाराच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून त्यांना पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

COMMENTS