परीक्षेतील गोंधळाबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी राजीनामा द्यावा – माधव भांडारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परीक्षेतील गोंधळाबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी राजीनामा द्यावा – माधव भांडारी

मुंबई : आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत

मुकेश अंबानींविरोधात मनसे आक्रमक
पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त नागरिकांना सूचना
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल विद्यार्थांचे पिंचाक सिलेक्ट  मध्ये व घवघवीत यश

मुंबई : आरोग्य विभागाच्या रविवारी झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याने अनेक विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागला. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

श्री. भांडारी यांनी पत्रकात म्हटले आहे की, आरोग्य विभागातर्फे मागील परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश सरकारने आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारनेही या कंपनीला काळया यादीत टाकले होते. मात्र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला आज झालेल्या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज झालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा , अशी भाजपाची मागणी आहे.

COMMENTS