परदेशी ड्रग्जचा सप्लायर बटाटाला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परदेशी ड्रग्जचा सप्लायर बटाटाला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जचा सर्वात मोठा सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटा एनसीबीच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून एनसीबीने तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे.

डेंग्यू नियंत्रणासाठी 9 राज्यांमध्ये केंद्राची आरोग्य पथके दाखल
बोगस कांदा अनुदान प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा दाखल
सर्वात मोठ्या तुंगत ग्रामपंचायत मध्ये सत्ता परिवर्तन

मुंबई/प्रतिनिधीः अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील परदेशी ड्रग्जचा सर्वात मोठा सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाब बटाटा एनसीबीच्या हाती लागला आहे. त्याच्याकडून एनसीबीने तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. 

शादाब बटाटा हा गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई आणि देशभरातल्या ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंधित होता. तसेच, बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना डहरवरल इरींरींर ड्रग्ज पुरवत होता, असे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा बॉलिवुडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींची नावे ड्रग्ज प्रकरणात समोर आली आहेत. यामध्ये अभिनेता अर्जुन रामपालचेदेखील नाव समाविष्ट आहे. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक सेलिब्रिटींच्या दारापर्यंत पोहोचायला लागल्यापासून एनसीबीने अधिक खोलात तपास सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एनसीबीने गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये फारूकचा मुलगा शादाब एनसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या भागांमध्ये मारलेल्या छाप्यांमध्ये दोन कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज सापडले आहे. त्यासोबतच, काही महागड्या कारदेखील हस्तगत केल्या आहेत. याशिवाय छाप्यामध्ये एक नोटा मोजण्याचे मशिन एनसीबीला सापडले आहे. एमडीएमसोबतच फारूख बटाटा एलएसडी, गांजा, बड आणि कोकेनसारखे ड्रग्जदेखील पुरवायचा अशी माहिती एनसीबीला मिळाली आहे. गुरुवारी दिवसभर एनसीबीकडून या प्रकरणात कारवाई केली जात होती. यामध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक चिंकू पठाण याच्या डोंगरी आणि नागपाडा भागातल्या ठिकाणांवर एनसीबीने छापे मारले. याआधी 7 मार्च रोजी एनसीबीने गोव्यामध्ये छापा टाकला होता. या छाप्यामध्ये एनसीबीने हेमंत साह उर्फ महाराजला अटक केली होती. सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी अनुज केसवानी आणि रीगल महाकाल यांच्याकडून महाराजबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा मारून त्याला अटक करण्यात आली आहे.

COMMENTS