परतीच्या पावसाची वाटचाल थंडावली… होणार ‘इतका’ विलंब

Homeताज्या बातम्यादेश

परतीच्या पावसाची वाटचाल थंडावली… होणार ‘इतका’ विलंब

प्रतिनिधी : पुणेनैऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मान्सून) राजस्तानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती तयार झाली नाही. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प

ओशो आश्रम गोंधळप्रकरणी 125 जणांवर गुन्हा
चक्क ! बघता बघता बुलेट पेटली l LOKNews24
मुख्याधिकार्‍यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा ः प्रांतधिकारी प्रसाद मते

प्रतिनिधी : पुणे
नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या (मान्सून) राजस्तानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती तयार झाली नाही. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा यंदा लांबणार आहे.

मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनच्या राजस्तानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी राजस्तानातून माघारीची तारीख 1 सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मान्सूनची संपुर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख 15 ऑक्टोबर आहे. आणखी आठवडाभर पोषक वातावरण होणार नसल्याने त्यानंतर मान्सूनचा परतीच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.

वायव्य भारतात असलेल्या पश्चिम राजस्तानमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात होते. यासाठी साधारणत: 1 सप्टेंबरनंतर त्या परिसरात सतत पाच दिवस पाऊस थांबणे, समुद्रसपाटीपासून साधारणत : 5 ते 8 किलोमीटर उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे तयार होणे.

तसेच त्या परिसरातील आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी होणे, असे बदल झाल्यास मान्सूनचा राजस्तानातून परतीचा प्रवास सुरू झाल्याचे समजले जाते. त्यानंतर देशाच्या उर्वरीत भागात मान्सून परतल्याचे जाहीर करण्यासाठी आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि पाच दिवस पाऊस थांबणे हे वातावरणीय बदल विचारात घेतले जातात.

तर मान्सून संपूर्ण देशातून परतल्याचे जाहीर करण्यासाठी 1 ऑक्टोबरनंतर दक्षिण द्वीपकल्पावर वार्‍यांची बदललेली दिशा विचारात घेतली जाते. नैऋत्य मोसमी वारे देशातून परतल्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मान्सून) सक्रीय झाल्याचे जाहीर केले जाते.

COMMENTS