पत्नी, मुलगी, जावयासह शरद पवार उद्धव ठाकरेंच्या घरी गेले गणरायाच्या दर्शनाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्नी, मुलगी, जावयासह शरद पवार उद्धव ठाकरेंच्या घरी गेले गणरायाच्या दर्शनाला

प्रतिनिधी : मुंबईराज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोरोना संकटाचा धोका लक्षात घेता अगदी सध्या पद्धतीने यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत

कष्टकर्‍यांना त्यांचे हक्कांचे घर मिळवून देऊ
महाज्योती, वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी निधी देताना हात आखडता घेणार नाही- मुख्यमंत्री
कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच l LokNews24

प्रतिनिधी : मुंबई
राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. कोरोना संकटाचा धोका लक्षात घेता अगदी सध्या पद्धतीने यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावरही बाप्पा विराजमान झाले आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, मुलगी सुप्रिया सुळे ,जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी सहकुटुंब पवार कुटुंबीयांचे स्वागत केले . यादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

COMMENTS