पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची लागण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतंजली योगपीठात 83 जणांना कोरोनाची लागण

उत्तराखंड येथील योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन
३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीला पोलिसांनी केले आईच्या स्वाधीन I LOKNews24
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन

हरिद्वार : उत्तराखंड येथील योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच बाबा रामदेव यांच्यासह इतरांचीही कोरोना चाचणी होणार आहे. हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. 

पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या सर्वांना योगपीठाच्या परिसरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असे डॉक्टर शंभू झा यांनी सांगितले. तसेच ऋषिकेशमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमधील ओपीडी बंद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ओपीडी काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS