पढेगांवला कृषि संजीवणी मेळावा संपन्न

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

पढेगांवला कृषि संजीवणी मेळावा संपन्न

तालुक्यातील पढेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने २१जुन ते १जुलै या कालावधीत कृषि संजीवणी मोहिम तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव व मंडळ कृषि अधिकारी चांगदेव जवणे यांचे मार्गदर्शनाखाली नुकताच शेतकरी मेळावा संपन्न झाला.

शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
वनपरिक्षेत्रच्या कार्यालयाची अवस्था स्थलांतरित बिबट्यासारखीच ः नितीन शिंदे


कोपरगाव प्रतिनिधी -तालुक्यातील पढेगाव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने २१जुन ते १जुलै या कालावधीत कृषि संजीवणी मोहिम तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव व मंडळ कृषि अधिकारी चांगदेव जवणे यांचे मार्गदर्शनाखाली नुकताच शेतकरी मेळावा संपन्न झाला.     या मेळाव्यात कृषि विभागाच्या विविध योजना,बीज प्रक्रिया,अठरा इंचावर सोयाबीन पेरणीचे फायदे,शेतकरी अपघात विमा योजना,महाटीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची पद्धत,ठिबक व तुषार सिंचन योजना ,खरीप व रब्बी हंगामातील पिक नियोजन याबद्दल शेतकऱ्यांना कृषि विभागाचे पर्यवेक्षक सुनील गावीत ,कृषि सहायक सचिन शिंदे ,प्रशांत बागल,जलपाल गिरासे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच प्रकाश शिंदे यांचेसह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS