पंतप्रधान मोदींचा आज  जिल्हाधिकार्‍यांशी संवाद  ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचा आज जिल्हाधिकार्‍यांशी संवाद ; देशातील 56 जिल्ह्यांत नगरचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (20 मे) देशभरातील कोेरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत व तो घेताना ते थेट जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

नगरमध्ये नराधमाने केला 74 वर्षीय वृद्धेवर अत्याचार
जिल्हा न्यायालयातील 23 न्यायाधीशांना निरोप
रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..

अहमदनगर/प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (20 मे) देशभरातील कोेरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत व तो घेताना ते थेट जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. केंद्र सरकारद्वारे या संवादासाठी निवडण्यात आलेल्या देशातील 56 जिल्ह्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील 17 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना यानिमित्ताने थेट पंतप्रधान मोंदींशी संवाद साधण्याची व नगर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येणार्‍या अडचणींची माहिती देण्याची संधी मिळणार आहे. 

    गुरुवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींद्वारे देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकांचे आयुक्त सहभागी होणार आहेत. कोरोनासंबंधी गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र, केरळ, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, छत्तीसगड, झारखंड व ओडिसा या राज्यांतील हे 56 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये नगरसह सोलापूर, चंद्रपूर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यांचा समावेश असून, तेथील अधिकार्‍यांशी पंतप्रधानांचा संवाद होणार आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पंतप्रधानांकडून काही सूचनाही केल्या जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत.

ज्या जिल्ह्यांत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, त्या जिल्ह्यांसाठी ही आढावा बैठक आहे. बैठकीत यासंबंधीच्या उपाययोजनांसह लसीकरण आणि केंद्राकडून अपेक्षित असलेल्या मदतीवरही चर्चा होणार आहे. याशिवाय संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होऊन मुद्दे मांडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यात आता मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत नव्याने आढळून येणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही 20 हजारांपर्यंत आहे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत असला तरी पुरेशा कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत व संथगतीने सुरू आहे. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण होण्याचे प्रमाण नगर जिल्ह्यात वाढले आहे. या मुद्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान, पीएम केअर फंडातून नगरच्या जिल्हा रुग्णालयाला हवेतून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रकल्प मिळाला असून तो कार्यान्वितही झाला आहे.

COMMENTS