पंतप्रधान जी-20 शिखर परिषदेसाठी रवाना

Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान जी-20 शिखर परिषदेसाठी रवाना

नवी दिल्ली : इटलीच्या रोम शहरात आयोजित जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी सकाळी रवाना झालेत. पंतप्रधान मोदी या

अंकुश आणि अबोली यांच्यात पुन्हा एकदा घेतलाय लग्न करण्याचा निर्णय.
आत्मा मालिकचे नीट परीक्षेत घवघवीत यश
राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; 13 हजार 177 प्रकरणे निकाली

नवी दिल्ली : इटलीच्या रोम शहरात आयोजित जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी सकाळी रवाना झालेत. पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच रोम दौरा असल्याचे राजदूत नीना मल्होत्रा यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या रोम दौऱ्यात रोमला तेथील गांधीजींच्या पुतळ्याचे दर्शन, इटालियन पंतप्रधान मारियो द्राघी यांची भेट आणि व्हॅटिकन सिटीला भेट असा कार्यक्रम निर्धारित आहे. त्यानंतर पंतप्रधान इंग्लंडला जाणार आहेत. ब्रिटनमधील ग्लासगो येथे पंतप्रधान मोदी कार्बन स्पेसच्या न्याय्य वितरणासह हवामान बदलाच्या मुद्द्यांवर सर्वसमावेशकपणे लक्ष देण्याची गरज यावर बोलतील.” रोममध्ये, मी सोळाव्या व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहीन. तिथे मी इतर जी-20 नेत्यांसोबत जागतिक आर्थिक आणि आरोग्य पूर्ती, शाश्वत विकास आणि हवामान बदल यांवर चर्चा करेन,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

COMMENTS