पंढरपूर विधानसभेत भाजपला मोठा धक्का ; कल्याणराव काळे हातात घड्याळ बांधणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर विधानसभेत भाजपला मोठा धक्का ; कल्याणराव काळे हातात घड्याळ बांधणार

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

खासदार विनायक राऊत यांचे योगदान शुन्य | LokNews24
साहेब, होतं नव्हतं सर्व गेलं, आम्हाला मदत केल्याशिवाय जाऊ नका; महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांसमोरच टाहो
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्‍चित करून योग्य दिशेने मार्गक्रमण करावे – भटनागर

पंढरपूर/प्रतिनिधीः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची लढत आता प्रतिष्ठेची बनली आहे. 

 भाजपने पोटनिवडणुकीसाठी समाधान अवताडे यांना रिंगणात उतरवले आहे तर, महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार आहे. असे असतानाच पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असून काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात भेट होणार असल्याचेही बोलले जात आहे. भालके यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी सरकोली येथे भालके कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान काळे आणि पवार यांच्यातही भेट झाली. त्याचवेळी आमच्याकडून काही चुका झाल्या होत्या; पण साखर कारखान्यांसाठी शरद पवार यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याच मदतीमुळे पंढरपूरमधील विठ्ठल, भीमा आणि चंद्रभागा कारखाने सुरू झाले आहेत. सरकोली येथील एका कार्यक्रमात पवार आणि काळे एकाच मंचावर उपस्थित होते. तेव्हाही त्यांनी भविष्यात पवार जे म्हणते, त्यानुसारच काम करणार, असे वक्तव्य केले होते. काळे यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनीच आश्‍चर्य व्यक्त केले होते.

कल्याणरावांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे पारडे जड

कल्याणराव काळे हे सोलापुरातील मोठे नेते आहेत. 2019मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या निवडणुकीत काळे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा प्रचार करणार आहेत.

COMMENTS