Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूर पोटनिवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार : राजू शेट्टी

ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले.

गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले
विज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा खरवंडी कासार ला फटका निम्मे गाव अधांरात
बंधार्‍यावरील लोखंडी दरवाजांची चोरी

सोलापूर : ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये बुडवले. अशा लोकांकडे निवडणुका लढवण्यासाठी पैसा आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजुने पाण्यासारखा पैसा वाहणार आहे. परंतु त्यांच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही अशी टिका भाजपा व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत असलेले सचिन पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ करण्यासाठी राजू शेट्टी पंढरपूर येथे आले होते. यावेळी ते बोलत होते. 

संघटनेचे रविकांत तुपकर, तानाजी बागल, रणजित बागल, विजय रणदिवे उपस्थित होते. पुढे राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आली आहे. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेने न्याय दिला आहे. पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील प्रमुख दोन उमेदवार साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. साखर आयुक्तांवर दबाव आणून आम्ही त्या दोघांवर महसुली थकबाकीची आरआरसी दाखल करायला भाग पाडले आहे. मात्र आजही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचे करोडो रुपये पैसे बुडवले आहेत. याचा राग व्यक्त करायला शेतकऱ्यांना संधी द्यायच्या उद्देशाने उमेदवार उभा केला आहे. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील वीजबील माफ करावे यासाठी आंदोलन करत होतो.

COMMENTS