पंजशीरमध्ये घनघोर युद्धाला प्रारंभ… ६०० हुन अधिक तालिबान्यांचा खातमा

Homeताज्या बातम्याविदेश

पंजशीरमध्ये घनघोर युद्धाला प्रारंभ… ६०० हुन अधिक तालिबान्यांचा खातमा

वेब टीम : काबूलअफगाणिस्तानच्या ईशान्य प्रांतातील पंजशीरमध्ये ६०० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती स्पुतनिक वृत्त

 खासगीकरणा विरोधात वीज कर्मचारी आक्रमक 
एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा प्रयत्न

वेब टीम : काबूल
अफगाणिस्तानच्या ईशान्य प्रांतातील पंजशीरमध्ये ६०० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे,

अशी माहिती स्पुतनिक वृत्तसंस्थेने रविवारी अफगाण प्रतिरोधक दलाच्या हवाल्याने दिली.

“सकाळपासून पंजशीरच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे ६०० तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. १००० पेक्षा अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे

किंवा त्यांनी आत्मसमर्पण केले आहे,” असे प्रतिकार दलाचे प्रवक्ते फहीम दष्टी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रवक्त्याने पुढे सांगितले की तालिबानला इतर अफगाण प्रांतांकडून मदत मिळण्यात समस्या आहे. स्पुतनिक वृत्त संस्थेने म्हटले आहे.

COMMENTS