न्यायमूर्ती रमण नवे सरन्यायाधीश

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

न्यायमूर्ती रमण नवे सरन्यायाधीश

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राऊतांनी घेतली सत्यपाल मलिकांची भेट
लग्नानंतर 6 दिवसातच नवरीने दिला बाळाला जन्म
बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदू मंदिरावर, घरांवर हल्ला

नवीदिल्लीः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीशपदासाठी नवीन नाव मागविण्यात आले होतं. त्यानंतर बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. 

बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात अखेरीस म्हणजे 23 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीशपदासाठी नवीन नाव सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. सध्या बोबडे यांच्यानंतर एन. व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. 64 वर्षीय रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 10 फेब्रुवारी 1983 पासून आपल्याला वकिलीला सुरुवात केली. संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहे.

COMMENTS