नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोपे तर उपाध्यक्ष जाधव

Homeताज्या बातम्याशहरं

नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या अध्यक्षपदी भोपे तर उपाध्यक्ष जाधव

सोनई नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या चेअरमन पदी विजय भोपे तर उपाध्यक्ष पदी संदीप जाधव यांची सर्वानुमते वार्षिक सभेत नियुक्ती करण्यात आली. निव

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
नगर अर्बन वाचवण्यासाठी भाजप सरसावले ; सत्ताधार्‍यांचे खा. विखेंनंतर मंत्री कराडांना साकडे
दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीद्वारे मोफत औषधांचे वाटप

सोनई

नेवासा तालुका सचिव स्टाफ सोसायटीच्या चेअरमन पदी विजय भोपे तर उपाध्यक्ष पदी संदीप जाधव यांची सर्वानुमते वार्षिक सभेत नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया अध्यासी अधिकारी एस.बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.


अध्यक्ष पदाची सूचना मावळते चेअरमन संदीप आदमाने यांनी तर अनुमोदन शिवाजी लोंढे यांनी दिले.व उपाध्यक्ष पदाची सूचना आप्पासाहेब बोर्डे यांनी करून अनुमोदन संभाजी नवले यांनी दिले.माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल संस्थेचे माध्यमातून चागली सेवा देण्याचे आश्वासन भोपे यांनी दिले.


या प्रसंगी जेष्ठ संचालक बाळासाहेब पटारे, प्रसाद गायकवाड, भागवत आरगडे, आदी संचालक उपस्थित होते. निवडणुकीकामी वसुली कक्षाचे श्री.व्ही.जे. लोळगे,व्यवस्थापक सुभाष सरोदे यांनी विशेष सहकार्य केले.

COMMENTS