नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी “भारतपुरी गोसावी” यांची निवड

सोनई-- नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी भारतपुरी गोसावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.   

विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताकदिना निमित्त रुग्णवाहिका चालकांचा सन्मान
बेरोजगारांना पुढच्या वर्षापर्यंत मिळणार ‘त्या’ योजनेचा लाभ
जयंत कबड्डी प्रिमियर लीग’चे 20 फेब्रुवारी ला शुभारंभ; राष्ट्रीय कबड्डीपटू खंडेराव जाधव यांची माहिती

सोनई–

नेवासा तालुका जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी भारतपुरी गोसावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

          नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणात संघटनेच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत श्री.गोसावी यांनी मांडले.यावेळी कार्यकरणीतील अध्यक्ष बन्सीभाऊ आगळे,तज्ञ सल्लागार नारायण नांदे,मानद सचिव आप्पासाहेब पटारे,सल्लागार पाराजी शिरसाठ, खजिनदार कृष्णा शिंदे,सदस्य श्री.पंडुरे,श्रीमती सुलोचना उंदरे -कोलते, यांच्यासह आदी उपस्थित होते.

          या निवडीबद्दल जेष्ठ साहित्यीक माजी.खा.यशवंतराव गडाख,जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,ह.भ.प.विश्वासराव गडाख,यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख,जिल्हा परिषदेचे अर्थखात्याचे सभापती सुनील गडाख, जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सुरेखा साळवे,पंचायत समितीचे सदस्य कारभारी डफाळ,माजी.प.स.सदस्य राजेंद्र गुगळे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,धनगरवाडीचे सरपंच सुनील वीरकर,आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS