नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार

 अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या   मोठ्या नुकसानी झाल्या आहेत . त्या नुकसानीची शासनाने कुठल्याह

पंढरपूर मतमोजणी आकडेवारीमध्ये तफावतीचा आरोप
कृषीकन्या विशाखा उघडे हिने साधला शेतकऱ्यांशी संवाद
मनसेला भोंगाविरोधी भूमिकेमुळे गळती

 अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट ,सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या   मोठ्या नुकसानी झाल्या आहेत . त्या नुकसानीची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही .   पाथर्डी ,शेवगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने वित्त आणि जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली . नदी नाल्यांना पूर येऊन गावे ओस पडली आहेत  . 

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून देखील शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी  पिकाची पाहणी करून त्याचे पंचनामे करणे महत्त्वाचे आहे . परंतु  ते  शेतकर्‍यांनाच करायला भाग पाडत असल्याने  शेतकऱ्यांना याची माहिती नसल्याने अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे ,

30 सप्टेंबर पर्यंत पिक पाहणीची मुदत असुन ती संपण्याआधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याने त्यावर तोडगा न निघाल्यास शिवसंग्राम पक्षाच्या वतीने  जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे पाटील व तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी आ सांगितले ,

COMMENTS