खंडाळा तालुक्याच्या शेतीची आर्थिक जलवाहिनी असलेल्या निरा-देवधर धरणाचे बंद पाईपलाईनद्वारे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील हरतळी या गावात टेस्टिंग यशस्वीपणे पार पडले आहे.
लोणंद /वार्ताहर : खंडाळा तालुक्याच्या शेतीची आर्थिक जलवाहिनी असलेल्या निरा-देवधर धरणाचे बंद पाईपलाईनद्वारे पाणी खंडाळा तालुक्यातील लाभ क्षेत्रातील हरतळी या गावात टेस्टिंग यशस्वीपणे पार पडले आहे. हे टेस्टिंग करीत असताना निरा देवधर प्रकल्प विभाग भोरचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी स्वतःहुन उपस्थित राहून या हरतळी मायनर बाबत खात्री करून घेतली.
उन्हाळी हंगामाचे कॅनॉलला पाणी सोडले असून जे पाईप लाईनचे काम केलेले आहे. त्या पाईप लाईनद्वारे शेतकर्यांच्या शेतात पाणी जाते आहे की नाही याची खात्री करून घेण्यात आली. सध्या निरा देवधरची पाईपलाईन डिस्ट्रीब्यूशन नेटवर्किंग कामे सुरु आहेत. हरतळी मायनर कामकाज पूर्ण झालेले असून बसविण्यात आलेल्या या पाईप लाईनद्वारे पाणी व्यवस्थित जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी हरतळी भागात चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झालेली असून या पाण्याचा या भागातील शेतकर्यांसाठी फायदा होणार आहे. बाकीच्या मायनरची कामे सुरू असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. हरतळी भागात या पाईपलाईनद्वारे पाण्याचे टेस्टिंग्ज करीत असताना येथे हे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे लोकांनी याबाबत ही समाधान व्यक्त केले आहे.
हरतळी प्रमाणे गावडेवाडी उपसा सिंचन, शेखमिरेवाडी उपसा सिंचन, वाघोशी उपसा सिंचन योजना ही लवकरात लवकर खंडाळा तालुकाभर यशस्वी व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. गेली पंचवीस वर्ष खंडाळा तालुका सर्व शेतकरी नीरा देवधर प्रकल्पाच्या पाण्यासाठी वाट पाहत आहेत. तरी गावडेवाडी उपसा सिंचन, शेखमिरेवाडी उपसा सिंचन, वाघोशी उपसा सिंचन
योजना पूर्ण झाल्यावर बहुतेक तालुका हा पाण्याखाली येणार आहे. या योजना लवकर पूर्ण झाल्या तर तालुक्याला मोठा फायदा होणार आहे.
नीरा देवधर कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील हरतळी मायनरचे पाईप डिस्ट्रीब्यूशन नेटवर्कचे काम पूर्ण झाले आहे. 31 मार्च रोजी त्याचे पाण्याचे टेस्टिंग पण करून झाले. निरा देवघर कालव्याचे सिंचनाचे आवर्तन सुरू केले आहे. पुढील आवर्तन पासून हरतळी मायनरच्या सर्व शेतकर्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
दिगंबर डुबल (कार्यकारी अभियंता, निरा-देवघर प्रकल्प विभाग भोर)
COMMENTS