निळवंड्याच्या कथित तारणहाराला  उशिरा का होईना उपरतीः विखे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंड्याच्या कथित तारणहाराला उशिरा का होईना उपरतीः विखे

वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली.

वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील कॅफे मालकाला अटक
पाच महसूल मंडळाचा समावेश करून शेतकर्‍यांना भरपाई द्या

लोणी/प्रतिनिधीः वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली. गेली  दहा वर्षे ही कामे धरणाच्या मुखापासून सुरू होवू शकली नाहीत. काहींना ही कामे सुरू होवू द्यायची नव्हती. कारण कालव्यांची कामे झाली असती, तर त्यांच्या तालुक्यात पाणी आले असते. दुसरा कारखाना उभा राहीला असता. नवे नेतृत्व उभे राहिले असते, याची भीती त्यांना होती. त्यामुळेच ते केवळ या प्रश्‍नांवर भूलथापा देत होते. कालपर्यंत निळवंडे प्रश्‍नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागले आहेत, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 71 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखे बोलत होते. समन्यायी पाणी वाटपाचे भूत या जिल्ह्याच्या मानगुटीवर अनेक वर्षे बसले आहे. त्या वेळी सत्तेत बसलेल्या मंडळींनी जिल्ह्यातील पाणी वाहून जात असतानासुद्धा शब्द काढला नाही. सत्ता गेल्यानंतर पाणी देण्यास विरोध करु लागले. आता सत्ता तुमच्याच ताब्यात आहे. महाभकास आघाडीचे तुम्ही नेते आहात, या कायद्याबाबत तुम्ही बोलत का नाही? समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करण्याची जबाबदारी आता तुमची आहे, अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. निळवंडेच्या कामास जेष्ठनेते मधुकरराव पिचड यांच्या पुढाकाराने या कामांना सुरुवात झाली. निळवंड्याचे स्वत:ला तारणहार समजणारे नेते आता खरे बोलू लागले आहेत. वरच्या भागात कामे सुरू होत नाहीत, तोपर्यंत खालच्या भागाला पाणी येणार नाही हेच आम्ही सांगत होतो. आता हे शहाणपण त्यांना उशिरा सुचले आहे; परंतु निळवंड्याला केवळ आमचा विरोध असल्याचे भासवून, याच कारणाने खासदार साहेबांना सातत्याने बदनाम केले गेले. कृती समित्या उभारुन जिरायती भागात शेतकर्‍यांना आंदोलने करायला लावली. आता तरी कृती समितीने डोळे उघडावेत. 

COMMENTS