निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू– नामदार थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी) दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण

रस्त्याच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण
अतिरिक्त ऊसाचे पंचनामे करा ; शेतकरी शिष्टमंडळाची मागणी
पोलिस अधिकार्‍याकडून पत्रकारास असभ्य भाषा

संगमनेर ( प्रतिनिधी)

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामासाठी अनेक अडचणी आल्या या सर्व अडचणींवर मात करून आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत प्रकल्प आपण राबविला. निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते .म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली . 2022 च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न असून यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू असल्याचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे ..

देवकौठे येथे जगदंबा दूध संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते .यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे , माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, सुनंदाताई जोर्वेकर ,मीराताई शेटे ,रामहरी कातोरे, अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, साहेबराव गडाख, अविनाश सोनवणे ,हौशीराम सोनवणे, प्रभाकर कांदळकर ,विष्णुपंत रहाटळ, भारतशेठ मुंगसे ,भागवतराव आरोटे, एकनाथ मुंगसे ,सुभाषराव सांगळे, चेअरमन राजेंद्र मुंगसे, व्हाईस चेअरमन नामदेव आरोटे, राजेंद्र कहांडळ ,सौ ज्योती मोकळ, अनिल गाजरे, विलास मुंगसे ,रामनाथ शेवकर,अदी उपस्थित होते ..

यावेळी सोसायटीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला..

याप्रसंगी नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठे बोगद्यांची कामे मार्गी लावली .मात्र मागील भाजप सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेथे कालव्यांच्या कामावर दोन जेसीबी कार्यरत होते तेथे आता 35 जेसीबी रात्रंदिवस काम करत आहे. दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत .ज्यावेळेस अडचणी येतात त्यावेळेस चर्चेने आपण मार्ग काढून कामे सुरू ठेवतो. हे कामे लवकरात लवकर पूर्ण करून 2022 च्या मध्यापर्यंत या भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे.

COMMENTS