शिवपुरी रोड जवळ असणार्या निळकंठ मळ्या शेजारच्या बंधार्यात गळतीमुळे पाणी साठा होत नव्हता म्हणून शेतकर्यांच्या मागणीवरून जि. प. सदस्या सौ. सुरेखा जाधव यांनी प्रयत्न करून बंधारा दुरुस्तीसाठी 4 लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. ठेकेदाराने 4 दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य आणून टाकले होते.
इस्लामपूर / प्रतिनिधी : शिवपुरी रोड जवळ असणार्या निळकंठ मळ्या शेजारच्या बंधार्यात गळतीमुळे पाणी साठा होत नव्हता म्हणून शेतकर्यांच्या मागणीवरून जि. प. सदस्या सौ. सुरेखा जाधव यांनी प्रयत्न करून बंधारा दुरुस्तीसाठी 4 लाखाचा निधी मंजूर करून आणला होता. ठेकेदाराने 4 दिवसांपूर्वी दुरुस्तीच्या कामासाठी साहित्य आणून टाकले होते. मात्र बुधवारच्या जोरदार पावसाने बंधार्याच्या पूर्वीच्या बांधकामातील काही दगड निसटून गेल्याने तो मधोमध फुटला आहे. त्यामुळे आता दुरुस्ती ऐवजी त्याठिकाणी नवीन बंधारा बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करावा, अशी मागणी कामेरी व शिवपुरी येथील शेतकर्यांनी केली आहे.
COMMENTS